लोहारा ता पाचोरा–विशेष प्रतिनिधी–(दिपक खरे)—पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीता वाघमारे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक पोलीस सेवा प्रशासन ग्रामसेवा व अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वाघमारे दाम्पत्य यांना “प्रेरणादायी दांपत्य पुरस्कार” जाहीर झाला आहे व या पुरस्काराचे वितरण १७सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन ,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र अशोक वाघमारे यांनी पोलिसांचे कर्तव्य बजावून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना गावोगावी शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याचा धडका लावल्याने अनेक तरुण प्रभावी झाले.त्यामुळे काही तरुणांना पोलीस खात्यात आणि सैनिक म्हणून भरती सुद्धा होता आले. तसेच त्यांच्या पत्नी सौ सुनीता वाघमारे यांनी आपल्या घराजवळील कामाला जाणारे शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावून त्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दररोज मोफत शिकवणी वर्ग घेत जे अनेक विद्यार्थी शाळेपासून दुरावलेले होते
त्या विद्यार्थ्यांनी शाळेचा रस्ता धरल्याने हा विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मोठ्या बदलाबाबत पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
या दोघ वाघमारे दाम्पत्यांच्या कार्याची दखल घेऊन जळगांव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय आदर्श प्रेरणादायी दांपत्य पुरस्कार २०२२-२३ हा पुरस्कार दोघांनाही जाहीर केला आहे.या पुरस्काराचे वितरण १७ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय ,जळगांव या ठिकाणी होणार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






