ठाणे :- जिल्ह्यातील जातीय अत्याचारातील दोन खून प्रकरणात नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे राज्य सचिव मां. वैभव गीते यांनी पीडित कुटुंबियांना भेटी दिल्या. व त्यांचे सांत्वन केले.दोन्ही खून प्रकरणात पीडित कुटुंबियांना भेटणारे ते पाहिले व एकमेव नेते आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली यांना तपासात अधिक पुरावे गोळा करण्याच्या त्यांनी सुचना केल्या. उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण परिमंडळ यांच्याकडे कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची व विशेष सरकारी वकिलांचे नियुक्तीची मागणी केली.दोन्ही कुटुंबाचे पुनर्वसन तात्काळ करा अन्यथा एन. डी.एम.जे. चा वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजकल्याण व महसूल विभागास त्यांनी दिला.
यावेळी तपासात असलेली प्रगती पोलीस विभागाने सांगितली. त्या सर्व आरोपींना अटक केली असून न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस विभागाने सांगीतले. दरम्यान दक्षता समितीचे सन्माननीय सदस्य,नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी वैभव गीते यांनी ठाणे जिल्ह्यातील चार खून प्रकरणात शासकीय नोकरी लाऊन पुनर्वसन केले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






