मा.जि.प.सदस्य श्री. नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते टाकरखेडे येथील आदर्श शिक्षक गणेश महाजन यांचा जाहीर सत्कार.

Spread the love


एरंडोल :- दि.13 सप्टेंबर रोजी टाकरखेडे ता.एरंडोल येथील शिक्षक श्री.गणेश महाजन यांना जिल्हा परिषद जळगावचा सन 2023 चा आदर्श शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला. त्यामुळे मा.जि.प.सदस्य श्री. नानाभाऊ महाजन यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.गणेश सुकदेव महाजन यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याशुभप्रसंगी गावाच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ.सीमाताई निवृत्ती कोळी यांचा देखील सपत्निक सत्कार मा.जि.प.सदस्य श्री. नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.


तसेच टाकरखेडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोलीचे उद्घाटन मा.जि.प.सदस्य श्री. नानाभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी गावाचे सरपंच श्री.प्रविण भाऊ पाटील,उपसरपंच सौ.सीमाताई कोळी,मा.उपसरपंच श्री. सुनिल भाऊ पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री. निवृत्तीभाऊ कोळी,शा. व्य.स.अध्यक्ष श्री.चंदू मालचे,जेष्ठ नागरिक श्री.धनराज पाटील, श्री.मच्छिंद्र पाटील,श्री. सुनील वाघ,दोनगाव खु. चे सरपंच श्री. सुरेश पवार,ग्रामसेवक श्री. हर्षल शिरसाठ व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधुरी देसले,सूत्रसंचालन श्री.भरत सुर्यवंशी तर आभार प्रदर्शन श्री. ज्योती पाटील यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार