पांढरद विकासोसायटी प्रथमच महिला राज
प्रथम महिला चेअरमनपदी निलाबाई एकनाथ पाटील

Spread the love

भडगाव l प्रतिनिधी :- पांढरद ता भडगाव जिल्हा जळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी गावाच्या इतिहासात प्रथमच महिला चेअरमनची बिनविरोध निवड करण्यात आली. विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाने एकमताने निलाबाई एकनाथ पाटील यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड केली.

व्हा चेअरमनपदी नेहरू महारू कोळी यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री जोशी साहेब यांनी काम बघितले. निवडी प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य गावातील जेष्ठ श्रेष्ठ मंडळी यांची उपस्थिती होती.

हे पण वाचा

टीम झुंजार