इंदापूर l प्रतिनिधी (हर्षल वाघमारे) :- बेलवाडी त.इंदापूर येथे मां. ॲड शुभम भैया निंबाळकर व मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या राष्ट्रवादी चषक 2023 भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष ॲड शुभम भैया निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रमासाठी नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती
त्यात महिला भगिनींनी उपस्थिती लक्षणीय होती यासाठी 1 11 111 रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते सदर दहीहंडी बारामती येथील श्रीकृष्ण दहीहंडी पथकाने 5 थराचे मनोरे रचून फोडली या वेळी युवकांन बरोबर इंदापूर चे आमदार दत्ता मामा भरणे यांनी गो गो गोविंदा म्हणत डी .जे. च्या तालावर मनमुराद नृत्य करत दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला त्याचबरोबर अभिनेत्री जुई शेरकर व शबनम पुणेकर यांनी आपली नृत्य कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली
कार्यक्रमास आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्याबरोबरच इंदापूर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे हनुमंत कोकाटे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सचिन सपकळ इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिन खामगल व पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष गणेश धंडोरे व त्यांचा मित्रपरिवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






