पाटणा : पाटण्यातील फुलवारी शरीफ येथे उत्तर प्रदेशातील बदायूं येथील तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसांनी उकललं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू, सासरा आणि पत्नीने मिळून तरुणाचा गळा आवळून खून केला.
मृताची पत्नी असमेरी खातून उर्फ मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केलं होतं. मृत सुभाष हा तिचा तिसरा पती होती. मृत सुभाष प्रजापतीच्या भावाचं म्हणणं आहे की, त्याच्या वहिनीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध होते आणि तिला चौथ्यांदा लग्न करायचं होतं.सुभाष याचा विरोध करायचा. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली.
पोलिसांचं म्हणणं आहे की, मयत हा अंमली पदार्थांचा व्यसनी होता, त्यामुळे त्याचं पत्नीसोबत अनेकदा भांडणं होत होतं. यातूनच त्याची हत्या करण्यात आली. कुटुंबीयांनी सांगितलं की, सुभाष प्रजापती याचा दोन वर्षांपूर्वी फुलवारी शरीफ येथील असमेरी खातून हिच्याशी विवाह झाला होता.असमेरी खातून हिचं यापूर्वी दोनदा लग्न झालं होतं. दोन्ही पतींना सोडल्यानंतर तिने दोन वर्षांपूर्वी सुभाष प्रजापती याच्याशी तिसरं लग्न केलं. मृताचा भाऊ ब्रिजेश प्रजापतीने सांगितलं की, असमेरी खातूनने सुभाषला आपल्या जाळ्यात ओढत त्याच्यासोबत लग्न केलं. असमेरी खातून हिला आधीच्या दोन पतींपासून दोन मुलंही आहेत.
पोलिसांची थेट दिल्लीत कारवाईसुभाष प्रजापतीचा भाऊ ब्रिजेश प्रजापतीने सांगितलं की, सुभाषची पत्नी असमेरी हिचे दुसऱ्या मुलासोबत अवैध संबंध होते. सुभाष या मृत्यूनंतर त्याची पत्नी असमेरी खातून हिला चौथ्यांदा त्या मुलासोबत लग्न करायचं होतं. याची माहिती सुभाष प्रजापतीला मिळाली होती. याची माहिती सुभाष यांना मिळताच त्यांनी पत्नी असमेरी खातून हिला विरोध सुरू केला. या विरोधामुळे पत्नी असमेरी खातून, सासू अख्तारी खातून आणि सासरे मोहम्मद अलाउद्दीन यांनी मिळून जावयाचा दोरीने गळा आवळून खून केल्याचं सांगण्यात येत आहे.
फुलवारी शरीफ पोलीस स्टेशनचे प्रभारी सफिर आलम यांनी सांगितलं की, शुक्रवारी सुभाष प्रजापती यांचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना मृताच्या मानेवर खुणा आढळल्या. त्यानंतर त्यांनी तपासाचा अँगल बदलला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर सुभाषची हत्या झाल्याचंही समोर आलं. सुभाष याच्या सासरच्या परिसरात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सासरच्या मंडळींची कडक चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






