आजचे राशीभविष्य, ( रविवार १७ सप्टेंबर २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. आज शारीरिक व मानसिक उत्साह अनुभवाल. मित्र व स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्यासह एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल. सूर्य संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. परदेश प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना यश प्राप्ती होईल. आपण प्रणयात सुद्धा अग्रस्थानी राहाल. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा जप करावा.

वृषभ :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन – लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल. सूर्य कन्येत आल्याने जमीन – जुमल्याच्या कामात आपणास मदत होईल. प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होऊ शकतात. हा महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. विद्वान लोकांची भेट होईल. शासना कडून लाभ होईल. कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावा.

मिथुन :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थां पासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन ह्या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील. सूर्य आता एक महिना कन्येत राहील. त्यामुळे आपल्या घरातील आनंद वृद्धिंगत होईल. लहान भावंडे आपणास सहकार्य करतील. व्यवसाय वृद्धी होईल. वडिलांशी संबंध दृढ होतील. कारकीर्द सुद्धा उंचावेल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.

कर्क :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रां कडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल. आर्थिक लाभ होऊ शकेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान – सन्मान वाढेल. सूर्य कन्येत आल्यामुळे आपण काहीतरी नवीन करण्यास उत्सुक व्हाल. एखाद्या तीर्थयात्रेचे आयोजन कराल. सरकारी कामात लाभ होईल. आपण प्रत्येक काम धाडसाने कराल. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा जप करावा.

सिंह :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल. सूर्य संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपली प्रकृती उत्तम राहील. ह्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे मात्र टाळावे. उपाय:-सूर्य मंत्राचा जप करावा.

कन्या :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल. सूर्य आपल्या राशीस आल्याने आपला अहंकार वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी किंवा व्यावसायिक भागीदाराशी मतभेद होत असल्याचे दिसू शकते. उपाय:-भगवान सूर्याची उपासना करावी.

तूळ :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सूर्य कन्येत आल्यामुळे आपल्या खर्चात वाढ होईल. आपणास प्रकृतीवर विशेष लक्ष द्यावे लागेल. परदेश प्रवासात सुद्धा सावध राहावे. ह्या दरम्यान आपली प्रकृती उत्तम राहील, तसेच जुन्या विकारांपासून सुद्धा आपली सुटका होईल. उपाय:-रोज गाईला पोळी खाऊ घालावी.

वृश्चिक :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज नोकरी – व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्या कडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. . वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. कन्या संक्रांति पासूनच्या महिन्याभरात आपल्या प्राप्तीत वाढ होऊ शकते. आपली प्राप्ती वाढेल. आपण आपल्या निश्चित योजनांवर पुढचे पाऊल टाकाल. त्यात आपला फायदा होईल. उपाय:-गायत्री उपासना करावी.

धनू :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन व विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात मान – सन्मान वाढेल. सूर्य संक्रांति पासूनचा एक महिना नोकरी व व्यवसायात उन्नतीदायक होईल. आपल्या कार्याची प्रशंसा होईल. असे असले तरी वैवाहिक जोडीदाराशी आपले मतभेद संभवतात. सरकारी कामात लाभ होईल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.

मकर :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. कन्या संक्राति पासूनचा एक महिना आपल्यासाठी काहीसा चिंताजनक असेल. एखाद्या जुन्या योजनेवर काम करणे अवघड होईल. दीर्घ पल्ल्याचे प्रवास संभवतात. नोकरीत स्थानांतर संभवते. उपाय:-एखाद्या नेत्र चिकित्सालयातील रुग्णाची सेवा करावी.

कुंभ :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्यापासून सुद्धा दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवाव. कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. सूर्य आता कन्येत आल्याने आपले आरोग्य बिघडण्याची संभावना आहे. आपण आजारी सुद्धा पडू शकता. आपल्या विरुद्ध एखादे कट – कारस्थान रचले जाऊ शकते. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा.

मीन :-

आज दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान – सन्मान होतील. सूर्य कन्येत आल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची संभावना आहे. व्यावसायिक भागीदाराशी सुद्धा आपले संबंध काहीसे तणावयुक्त होऊ शकतात. असे असले तरी काही नवीन संबंध जुळतील. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण करावे.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार