चाळीसगाव :- सैन्यदलात भरतीसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्याने नैराश्याने ग्रासलेल्या २१ वर्षीय तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना देवळी (ता. चाळीसगाव) येथे येथे बुधवारी (ता.१३) सकाळी उघडकीस आली.
देवळी (ता. चाळीसगाव) येथील राज अशोक पाटील (वय २१) हा सैन्यदलात भरती होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करीत होता. मात्र, अपयश येत असल्याने तो नैराश्यग्रस्त झाला होता. मंगळवारी (ता. १२) राजने कुटुंबीयांसोबत जेवण केले.
रात्री अकराच्या सुमारास तो घरी वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेला. बुधवारी (ता. १३) सकाळी सहाला राजचे वडील अशोक पाटील हे गुरांचे दूध काढण्यासाठी राजला उठविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले असता, त्याने छताला असलेल्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले हा प्रकार कुटुंबीयांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने राजचा मृतदेह विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
सैन्यदलाच्या भरतीत अपयश आल्याने त्याने जीवन संपविल्याची चर्चा गावात होती. या प्रकरणी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






