मुंबई :- विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीने 10 न्यूज चॅनल्सच्या एकूण 14 टीव्ही अँकर्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज अँकरची यादीही जाहीर केली आहे. यात सुधीर चौधरी, अर्णब गोस्वामी, चित्रा त्रिपाठी, अदिती त्यागी, अमन चोपडा, अमीश देवगन, आनंद नरसिंहा, अशोक श्रीवास्तव, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर आणि सुशांत सिन्हा या अँकर्सचा समावेश आहे.
यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, “रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही,” असे INDIA आघाडीने ठरवले आहे. आमचा उद्देश आहे ‘द्वेश मुक्त भारत’. “जुडेगा भारत, जीतेगा INDIA.”
I.N.D.I.A च्या तिसऱ्या बैठकीत तयार करण्यात आल्या 5 समित्या …….
गेल्य 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये विरोधी आघाडीची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह एकूण 28 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत समन्वय व प्रचार समितीसह एकूण 5 समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
5 सप्टेंबरला झाली प्रचार समितीची बैठक …….
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली 5 सप्टेंबरला दिल्ली येथे I.N.D.I.A च्या कॅम्पेन कमिटीची पहिली बैठक पार पडली. यात मध्य प्रदेशसह 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तयारीसंदर्भात चर्चा जाली. याच बरोबर, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशणासंदर्भातील रणनीतीवरही चर्चा झाली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






