लखनऊ- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातून अत्यंत वेदनादायी बातमी समोर येत आहे. छेड काढणाऱ्या दोन मुलांमुळे एक सतरा वर्षीय निर्दोष मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलगी सायकलवर शाळेतून घरी येत असताना मोटारसायकवरुन येणाऱ्या दोन आरोपींनी तिची ओढणी ओढली.
त्यामुळे तिचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडली अन् पाठीमागून येणारी मोटारसायकल तिच्या डोक्यावरुन गेली. त्यामुळे तिचा मृत्यू झालाय.
सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीची काही चूक नसताना दोन मुलांच्या दुष्कृत्यामुळे तिचा जीव गेला आहे. मोटारसायकलवरुन आलेल्या दोन आरोपींनी मुलीचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिची ओढणी खेचली. सायकलवर असणाऱ्या मुलीचा त्यामुळे तोल गेला आणि ती रस्त्याच्या उजव्या बाजूला ढकलली गेली.
रस्त्यावरुन त्याच वेळी दुसरी मोटारसायकल येत होती. मुलीची या मोटारसायकलला जोराची धडक बसली. यात मुलीचा जबडा तुटला. तसेच तिच्या डोक्याला जबर मार लागला. लोक गोळा झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद फेजल, शाहबाज आणि त्याचा भाऊ अरबाज याला अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी २० वर्षाच्या आतील आहेत. शाहबाज आणि अरबाज मोटारसायकलवर होते त्यांनी मुलीची ओढणी ओढली. मुलगी ओढणी वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर पडली. पाठीमागून येणाऱ्या फैजलने मुलीच्या अंगावर मोटारसायकल घातली. तिच्या डोक्यावरुन मोटारसायकल गेल्याचं सांगितलं जातं.
पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुलीचा विनयभंग आणि मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असामाजिक घटकांना नियंत्रणात ठेवण्यात पोलिस कमी पडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






