अंजनी प्रकल्पातील जलसाठा 70% टक्यांवर नागरिकांमध्ये समाधान, अंजनी नदीला अद्यापपर्यंत एक पुर नसल्यामुळे नदी पात्रात घाणीचे साम्राज्य

Spread the love

एरंडोल :-शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणा-या अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात पाण्याची आवक होत असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठा सुमारे ७० टक्के झाला आहे.प्रकल्पात पाण्याची आवक अशाच प्रमाणात सुरु राहिल्यास प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के होण्याची शकयता आहे.दरम्यान प्रकल्पात समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गात समाधानव्यक्त केले जात आहे.

पळासदड (ता.एरंडोल) येथील अंजनी प्रकल्पात आठ दिवसांपासून पाण्याची आवक वाढली असल्यामुळे प्रकल्पातील जलसाठा वेगाने वाढत आहे.सद्यस्थितीत प्रकल्पात सुमारे ७० टक्के जलसाठा झाला असून पाण्याची आवक सुरु असल्यामुळे जलसाठा शंभर टक्के होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.प्रकल्पातून एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.तसेच धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडले जाते. अंजनी प्रकल्पाच्या वर अनेक लहान बंधारे असून सदर बंधारे पूर्ण भरल्यानंतर प्रकल्पात पाण्याची आवक सुरु होत असते.

अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात जोरदार पाउस झाल्यास प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होत असते.अंजनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास मासेमारीचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो.प्रकल्प
पूर्ण क्षमतेने भरल्यास रब्बी पिकांसाठी देखील पाण्याचे आवर्तन सोडले जात असते.यावर्षी पावसाळा लांबल्याने प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्यामुळे शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.प्रकल्पातील जलसाठ्याची शंभरीकडे वाटचाल होत असल्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मागील आठ वर्षांपासून प्रकल्पात शंभर टक्के
जलसाठा होत असल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत देखील वाढ होत असल्यामुळे रब्बी पिकांना त्याचा फायदा होत असतो.तालुक्यात अद्यापपर्यंत
जोरदार पाऊन न झाल्यामुळे नदी,नाले कोरडे असून अंजनी नदीला अद्यापपर्यंत एकदाही पूर आलेला नाही त्यामुळे नदीच्या पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले
आहे.शेतात देखील पाउस वाहून न निघाल्यामुळे जमिनीतील ओलावा अत्यंत कमी प्रमाणात झाला आहे.मागील वर्षी सततच्या पावसामुळे अंजनी नदीचे पात्र सुमारे चार महिने वाहत होते.

हे पण वाचा

टीम झुंजार