रात्रीचे जेवण आई-वडील, बहिणीसोबत केले, गप्पा केल्या,रात्री खोलीत झोपायला गेलेल्या तरुणाने घेतला टोकाच्या निर्णय,कुटुंब हादरले.

Spread the love

जळगाव : रात्रीचे जेवण आई-वडील आणि बहिणींसोबत केले. यानंतर गप्पा केल्या व घराच्या वरच्या खोलीत झोपायला गेला. परंतु खोलीत गेल्यानंतर गळफास घेत त्याने जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. कुसुंबा (ता. जळगाव) येथील तेजस धोंडू पाटील असे या तरूणाचे नाव आहे.

तेजस रात्री रूममध्ये झोपायला गेला परंतु दिवस उजाडूनही मुलगा खाली येत कसा नाही, म्हणुन वडील उठवायला गेले असता त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यावेळी कुटूंबासह शेजाऱ्यांनी धाव घेतली.

याबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
वडिलांना कामात करायचा मदत
तेजसच्या वडिलांचे गॅरेज आहे. दरम्यान तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. घरातील करता मुलगा गेल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार