रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर मोटारसायकल धडकल्याने तीस वर्षीय युवकाचा मृत्यू,एक जखमी.एरंडोल येथील घटना.

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल
:- रस्त्याच्या कडेला चुकीच्या दिशेने उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल धडकल्याने तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना काल (ता.१७)वरात्री दहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल जत्रा समोर झाला. याबाबत माहिती अशी,की जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे आणि त्यांचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे हे मोटार सायकल क्रमांक एम.एच.२१ बी.एम.८१३० ने पारोळ्याकडून जळगावकडे जात होते.

रात्री दहा वाजेच्या सुमारास एरंडोल येथील हॉटेल जत्रा जवळ रस्त्यावर चुकीच्या दिशेने उभी असलेली ट्रक क्रमांक ए.एच.०४ एफ ४६३२ उभी होती.रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने असलेली मोटारसायकलने ट्रकच्या मागील बाजूने जोरदार धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील दोन्ही जन रस्त्यावर फेकले गेले.यामध्ये मोटारसायकलचालक योगेश निवृत्ती वानखेडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अत्र त्यांचे सहकारी भगवान सोनवणे हे गंभीर जखमी झाले.

अपघाताचा आवाज एकताच हॉटेल जत्रामधील कर्मचारी, के.के.वाईन्स मधील कामगार व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरु करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुले राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र रक्त सांडले होते.तसेच महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.पोलिसांनी त्वरित अपघातस्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली.ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीयअधिका-यांनी दोघांना तपासले असता योगेश निवृत्ती मरण पावल्याचे जाहीर केले.

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा-यांनी अपघातात गंभीर झालेल्या युवकाकडून माहिती घेवून मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली.मयत योगेश वानखेडे यांचे मामा आप्पाराव कापरे,मोठे भाऊ कारभारी वानखेडे आणि मेव्हणे संदीप थोरात यांनी त्वरित एरंडोल येथे येवून मयताची ओळख पटवली.सकाळी डॉ.मुकेश चौधरी यांनी पोस्टमार्टेम करूनमृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

याबाबत आप्पाराव कापरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष चौधरी तपास करीत आहे.मयत योगेश वानखेडे हा पूर्वी औषध विक्रीच्या दुकानावर कामाला होता. स्वत:चा व्यवसाय सुरु करावा या उद्देशाने त्याने नुकतेच हार्वेस्टर मशीन घेतले होते. खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र पाहण्यासाठी योगेश आणि त्याचा मित्र भगवान हे आले होते. पारोळा,एरंडोल तालुक्यातील माहिती घेवून ते मध्यप्रदेशात जाणार होते.

मात्र रस्त्यावरच काळाने योगेशवर घाला घातल्यामुळे त्यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले.योगेशच्यापच्छात आई,वाडी,भाऊ,पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.अपघातात जखमीझालेला भगवान सोनवणे याची आर्थिक परिस्थितीदेखील गरिबीची असून जे.सी.बीवरचालक म्हणून तो काम करून परिवाराचा चरितार्थ चालवत होता.

हे पण वाचा

टीम झुंजार