Effective And Very Fast Home Remedy For Cough: मुलांना सतत खोकला असेल, छातीत कफ झाल्यासारखा वाटत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..
पावसाळ्याचे दिवस म्हटलं की घरात बऱ्याचदा कोणी ना कोणी सर्दी- खोकला- कफ अशा त्रासांनी त्रस्त असतं. मग एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होतं आणि घरातले सगळेच एकेकदा आजारी पडतात. मोठ्या मंडळींचं तरी एकवेळ ठिक आहे. पण लहान मुलांना जर दुखणं आलं तर ते निस्तरताना त्यांच्या पालकांच्या आणि विशेषत: आईच्या मात्र नाकी नऊ येतात. खोकला, कफ तर लवकर कमी होतच नाहीत आणि अशा आजारांसाठी वारंवार ॲलोपॅथीची औषधं द्यायलाही नको वाटतं (Ayurvedic solution for cough). म्हणूनच हा एक डॉक्टरांनीच सुचविलेला उपाय करून पाहा. दोन दिवसांतच मुलांच्या छातीतला कफ मोकळा होईल.

हा उपाय dr.nitasha_gupta या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला असून तो करायला अगदी सोपा आहे. मुलांना कफचा त्रास झाल्यास सुरुवातीचे दोन- तीन दिवस हा उपाय करून पाहायला हरकत नाही.
पण फरक पडतच नाहीये किंवा कफ खूपच जास्त असेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा उपाय करण्यासाठी आपल्या आपल्या स्वयंपाक घरातलेच ३ पदार्थ लागणार आहेत. ते कोणते पदार्थ आणि नेमका कसा उपाय करायचा, ते आता पाहूया…
मुलांना कफ झाल्यास घरगुती उपाय

- १. हा उपाय करण्यासाठी २ टेबलस्पून मोहरीचं तेल, लसूणाची एक मोठी पाकळी आणि पाव चमचा ओवा हे ३ पदार्थ लागणार आहेत.
- २. सगळ्यात आधी फोडणीची असते ती लहान कढई गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात तेल टाका.
- ३. लसूणाची पाकळी किसून घ्या किंवा बारीक ठेचून घ्या. लसूण पाकळी खूपच लहान असेल तर २ घेतल्या तरी चालतील.
- ४. कढईतलं तेल गरम झालं की त्यात लसूण पेस्ट आणि ओवा टाका. तेल कडक होऊ देऊ नये.
- ५. लसूण लालसर रंगाचा झाला की गॅस बंद करा. आता हे तेल गाळून घ्या आणि कोमट झालं की त्या तेलाने मुलांच्या तळपायाला मालिश करा. तसेच थोडंसं तेल छातीलाही लावा. २ दिवसांतच कफ मोकळ होईल.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






