मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने चारचाकी चालकाने दोन दुचाकी स्वारांंना उडवले म्हैसही ठार, ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून पकडले

Spread the love

प्रतिनिधी | अमळनेर

मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने चारचाकी स्वीप्ट गाडी चालवून म्हशीला झाडी गावात जोरदार ठोस देवून ठार केले तर मुडी येथील मोटारसायकल स्वाराला जखमी करून लोण येथील दोन्ही पादचारी तरुणांना धडक मारून जखमी अवस्थेत सोडून पळ काढणाऱ्या वाहन चालकाला बाम्हणे गावी पोलीस पाटील गणेश भामरे यांनी ट्रॅक्टर आडवे करून अडविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी शेतातून वाहन काढण्याचा प्रयत्न फोल ठरला आणि चार चाकी गाळात फसल्याने निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडत ग्रामपंचायतीत कोंडून ठेवल्यावर मारवड पोलिसांनी त्यांना वाहनसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

सायंकाळी ४ वाजता स्विफ्ट गाडी (क्रमांक एमएच २८ बीक्यू ८०५९) च्या चालकाने झाडी गावाजवळ म्हशीला जोरदार धडक दिली. त्यात म्हैस जागीच ठार झाली. त्यानंतर त्यांनी लोण व मूडी येथे भरधाव वेगाने वाहन चालवल्याने मूडी येथील एका दुचाकीस्वाराला धक्का लागून तो किरकोळ जखमी झाला. त्यानंतरही त्याने वाहन न थांबवल्याने झाडी, लोण व मूडी येथील ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला असता तो सुसाट गाडी पळवू लागला. यावेळी या ग्रामस्थांनी बाम्हणे येथे संपर्क साधत पोलीस पाटील गणेश भामरे यांना माहिती दिल्याने बाम्हणे ग्रामस्थांच्या मदतीने गावाबाहेर ट्रॅक्टर आडवे लावले.

सदर वाहनचालकाला पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने त्याने आपले वाहन शेतात वळविले. मात्र चिखलात गाडी अडकल्याने वाहनचालक भीतीने कपाशीच्या शेतात लपून बसले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना शोधून पकडत बाम्हणे गावात आणले असता त्याठिकाणी लोण, मूडी, झाडीसह स्थानिक नागरिक जमल्याने मोठा जनसमुदाय त्याठिकाणी जमला होता. दोन्ही मद्यधुंद अवस्थेत असल्याने जनप्रक्षोभ वाढत चालला होता. सुज्ञ नागरिकांनी वाहनचालक व त्याच्या साथीदाराला ग्रामपंचायतीत कोंडत पोलिस पाटील गणेश भामरे यांनी मारवड पोलिसांना कळविले.

भामरे यांनी सपोनि शितलकुमार नाईक यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची कल्पना दिली , एपीआय शितलकुमार नाईक, हवालदार फिरोज बागवान, भरत गायकवाड,सुनील तेली , पोलीस दिनेश पाटील, पोलीस पाटील गणेश भामरे यांनी जनप्रक्षोभ शांत करत त्या दोघांना पोलीस ठाण्यात रवाना केले. पोलीस नाईक सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक दिनेश उखा पाटील (रा. उपरपिंड ता. शिरपूर) व त्याच्या साथीदाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास हवालदार भरत गायकवाड करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार