एरंडोल सोसायटीचे नामकरण क्रांतिसूर्य महात्मा फुले होणार, वार्षिक सभेत एकमताने ठराव मंजूर.

Spread the love

एरंडोल :- येथील एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नाव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विविध कार्यकारी सहकारी सोसायटी करण्यात यावे असा
ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.सोसायटीची ९७वी वार्षिक सर्वसाधारण सभा सितारामभाई बिर्ला सभागृहात संपन्न झाली.संस्थेचे
अध्यक्ष विजय महाजन अध्यक्षस्थानी होते.सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तालुक्यातील सर्वात जुनी आणि मोठी सहकारी संस्था असून संस्थेमार्फत शेतक-यांसाठी विविध उपक्रम
राबवले जातात.संस्थेचे शंभराव्या वर्षाकडे वाटचाल सुरु आहे.संस्थेच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीत संचालक मंडळाची निवडणूक देखील बिनविरोध होत असते. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत संपन्न झाली.सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे नामकरण क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले करण्यात यावे हा ठराव टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आला.तसेच संस्थेच्या सिटी सर्व्हे.क्रमांक ३१४ वर व्यापार संकुलाचे बांधकाम करून संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांनी सभासदांना
प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,रवींद्र महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी अध्यक्ष
दुर्गादास महाजन,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,श्री.लढे सर,advt.ए.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांनी प्रास्ताविक
केले.सचिव बापू पाटील यांनी सुत्रसंचलन केले.युवराज महाजन यांनी आभार मानले.सभेस उपाध्यक्षा निर्मलाबाई महाजन,संचालक राजेंद्र चौधरी,वामन
धनगर, पंडित पाटील,नारायण पाटील,राजधर महाजन, advt.नितीन महाजन,योगराज महाजन,सुमनबाई माळी,जावेद मुजावर,ज्ञानेश्वर पाटील,सुरेश देशमुख, इच्छाराम महाजन,रघुनाथ ठाकूर,आशीर्वाद पाटील,रुपेश माळी,अरुण पाटील,राजेंद्र महाजन, advt. विलास मोरे,भास्कर पाटील,रवींद्र पाठक,सुदर्शन महाजन,पंडित
महाजन,रमेश महाजन,दत्तात्रय जोशी,शेख सांधू शेख मोहम्मद,भिका महाजन यांचेसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेसाठी मन्साराम माळी,अशोक
जोशी,भगवान माळी,निंबा माळी यांचेसह कर्मचा-यांनी सहकार्य केले.

टीम झुंजार