शिरपूर :- वडिलोपार्जित जमिनीची दोन भावांमध्ये हिस्सेवाटणी करायची होती. मात्र या हिस्सेवाटणीतून भावांमध्ये वाद झाला. यात सख्ख्या भावासह पुतण्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
जैतपूर (ता. शिरपूर) येथे हि घटना ही घटना १५ सप्टेंबरला घडली. जैतपूर शिवारात मोंडूसिंह अंबरसिंह राजपूत यांची शेती आहे. त्यांच्या शेताची हिस्सेवाटणी झालेली नाही. त्यांच्या सहा मुलांपैकी विजयसिंह राजपूत (रा. जैतपूर) यांच्या वाट्याला केवळ दोन एकर शेती आली. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त शेती मिळावी, अशी मागणी भावांकडे केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते.
शेतीच्या वाटणीवरून भावांमध्ये वाद झाला. दरम्यान १४ सप्टेंबरला ते शेतात बैल घेण्यासाठी गेले असता ‘तुम्हाला ट्रॅक्टर, म्हशी यापैकी काहीच देणार नाही, शेतात पाय ठेवू नका’ अशी धमकी संशयितांनी दिली होती. यानंतर मोंदूसिंग राजपूत यांना मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. थाळनेर पोलिसांनी संशयितांना अटक केली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






