प्रतिनिधी | एरंडोल तालुक्यासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतुन महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभागांतर्गत प्राप्त झालेल्या फिरते पशुचिकित्सक पथकाला हिरवा झेंडा दाखवुन शुभारंभ आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख राजुआबा चौधरी, बाजार समिती मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, पंचायत समिती मा.उपसभापती अनिलभाऊ महाजन, तालुका संघटक संभाआबा पाटील, शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),
मा.नगराध्यक्ष विठ्ठलभाऊ आंधळे, राजुदादा परदेशी, मा.नगरसेवक संजय चौधरी, अंतुर्ली उपसरपंच गौरव पाटील, शहरसंघटक मयुर महाजन, उपतालुकाप्रमुख गोविंदा राठोड, गोविंदा बिर्ला यांचेसह आदी पशुधन धारक व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. एरंडोल तालुक्यासाठी फिरते पशुचिकित्सक पथक (१महिंद्रा बोलेरो रूग्णवाहीका) मिळालेली आहे. याव्दारे एरंडोल तालुक्यातील गायवर्ग २६८९३, म्हैसवर्ग १७८६०, शेळी-मेंढी १८२८८ व इतर पशुधनावर शेतकऱ्यांच्या दारात तातडीची सेवा तज्ञ पशुवैद्यकांच्या हाताने समक्ष शासकीय दरात उपलब्ध होणार आहे.
फिरते पशुचिकित्सक पथकात १ वाहन चालक तथा परिचर, १ पदवीधर पशुवैद्यक व १ पशुधन पर्यवेक्षक यांचा समावेश असणार आहे. फिरते पशुचिकित्सक पथकाचे कार्यक्षेत्र संबंधित संपुर्ण तालुका राहील. त्यामुळे गोर-गरिब, दुर्बल शेतकऱ्यांना या पथकाव्दारे चांगल्या प्रकारे सोय झालेली असून त्यांना शासकीय दरात शेतकऱ्यांच्या दारात तज्ञ पशुवैद्यकीय सेवा कमीत कमी वेळात उपलब्ध करण्यात येणार आहे.
त्यामुळे आर्थिक दृष्ट्या पशुपालकांच्या पशुवरती योग्यवेळी अचुक उपचार झाल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होणार नाही. ही फिरते पशुचिकित्सक पथक सर्वसामान्य जनतेच्या खुप हिताचे असुन चांगला प्रतिसाद मिळणार अशी आशा आहे, तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मनात शासनाच्या प्रति चांगली प्रतिमा तयार होईल व शासनाचे हे उद्दीष्ट साकार होईल यासाठी प्रामाणिकपणे, मेहनतीने ही सेवा बजावण्यात यावी अश्या सुचना यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी उपस्थित पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
तसेच पशुधनधारक शेतकरी बांधवांनी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यावर द फिरत्या पशुचिकित्सा सेवा उपलब्ध होणार आहे तरी या फिरते पशुचिकित्सक पथकाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मा.चिमणराव पाटील यांनी याप्रसंगी केले.यावेळी पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रातर्फे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉक्. ए एस महाजन, डॉ. प्राप्ती पारखे, डॉ. शेळके, डॉ. पी डी पाटील,डॉ चिंचोरे,डॉ. सपकाळे,डॉ साळुंखे,डॉ. जाधव यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






