एरंडोल :- हनुमंतखेडे बुद्रुक (ता.एरंडोल) येथील ६२ वर्षीय शेतक-याचा अंजनी नदीच्या पात्रात वाहून मृत्यू झाल्याची घटना काल (ता.२४) सात वाजेच्या
सुमारास घडली.शेतकरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी रात्रभर नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेतला.आज सकाळी त्यांचा मृतदेह गावाजवळच नदीच्या किना-यावर सापडला.याबाबत माहिती अशी,की तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाउस झाल्यामुळे अंजनी नदीला पूर आला होता.
हणमंतखेडे बुद्रुक येथील राजेंद्र भगवान पाटील (साळुंखे) वय ६२ हे रात्री सात वाजेच्या सुमारास शेतातील कामे आटोपून घराकडे जात होते.अंजनी नदीच्या पुलावरून जात असतांना त्यांचापाय घसरल्याने ते पात्रात पडले.राजेंद्र पाटील नदीच्या पात्रात पडल्याचे
समजताच ग्रामस्थांनी नदी पात्राकडे धाव घेवून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांचा शोध लागला नाही.ग्रामस्थांनी घटनेची माहिती आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना दिली.बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील पदाधिका-यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी
माहिती जाणून घेतली.
अमोल पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि त्वरित मदत करण्याचे आवाहन केले. एस.डी.आर.एफ पथक तातडीने कार्यरत करण्याचे आवाहन केले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच हनुमंतखेडे जाऊन ग्रामस्थांकडून दुर्घटनेबाबत माहिती जाणून घेतली.दरम्यान गावातील वाल्मिक पाटील, हरिदास पाटील,विक्की पाटील,विकास पाटील,भाऊसाहेब पाटील, मोतीराम पाटील,पोलीस पाटील प्रशांत पाटील,शरद पाटील,नागेश पाटील यांचेसह ग्रामस्थांनी नदीच्या पात्रात राजेंद्र पाटील यांचा शोध घेतला,मात्र अंधार असल्यामुळे ते सापडू शकले नाही.
सकाळी त्यांचा मृतदेह गावालगतच नदीच्या पत्रात सापडला.राजेंद्र पाटील यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून त्यांचे पच्छात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.याबाबत पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली. सद्यस्थितीत सर्वत्र जोरदार पाउस होत असल्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होत असून ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी असे आवाहन
उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.यावेळी युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील यांचेसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी राजेंद्र पाटील
यांच्या परिवाराची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






