एरंडोल :- दहा दिवस सुरू असलेला गणेशोत्सवाची समाप्ती म्हणजे अनंत चतुर्थी आज गणरायाला शेवटच्या निरोप देण्यासाठी शहरातील घरगुती गणपती, शहरातील सार्वजनिक मंडळे, नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज झाला आहे.
एरंडोल शहरात जय गुरु व्यायाम शाळा, सावता माळी व्यायाम शाळा, बालवीर गणेश मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा, बालमित्र गणेश मंडळ,नम्रता गणेश मंडळ , सर्वोदय गणेश मंडळ, माहेश्वरी नवयुवक मंडळ, अखिल ब्रह्मवृंद गणेश मंडळ, चौक गणेश मंडळ, ज्ञानदीप गणेश मंडळ, नागराज मित्र मंडळ,श्री संताजी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा, श्रीराम मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, हरीपुरी मित्र मंडळ, हे मुख्य 18 सार्वजनिक मंडळे आहेत.
यांच्या विसर्जनाला सुरुवात दुपारी तीन वाजेपासून होत असते. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे विसर्जन सुरुवात होते. एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे याच्यातर्फे सार्वजनिक मंडळाच्या विसर्जनाच्या मार्गावर लाइटिंग ची व्यवस्था करण्यात आलेली आहे, घरगुती गणपती विसर्जनासाठी संकलन केंद्र कासोदा दरवाजा व मरी माता मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले आहे. नगरपालिकेमार्फत सर्व सार्वजनिक मंडळांचा सत्कार करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांच्या मुर्त्या विसर्जनासाठी जुने पद्मालय येथे पट्टीचे पोहणाऱ्यांची टीम तयार तैनात करण्यात आली आहे,
मुख्य मिरवणुकी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली आहे. श्री भक्तांकडून कासोदा दरवाजा येथे मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनातर्फे सार्वजनिक गणेश मंडळांना रात्री बारा वाजेच्या आत सर्व गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात यावे याबद्दल 49 प्रमाणे नोटीस देण्यात आले आहे व आवाहन करण्यात आले आहे. तसेच डीजे या वाद्याला पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कर्मचारी, होमगार्ड विसर्जनासाठी सज्ज झाले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






