मोटार सायकल चोरी करणारे दोन आरोपी,व रिक्षा चोरी करणाऱ्या एक आरोपीस चाळीसगाव शहर पोलीसांनी केली अटक.

Spread the love

चाळीसगाव :- दिनांक 23/09/2023 रोजी फिर्यादी तन्वीर शेख रा. चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहरात गणेश कॉम्पलेक्स परिसरात त्यांची 49,000/- रु. कि.ची मोटार सायकल लावली असता अज्ञात दोन इसम ते चोरी करून घेऊन जात असतांना फिर्यादी यांना दिसल्याने त्यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने त्यांना अटकाव केला असता त्यातील एक इसम गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. सदरची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळविल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. कडील पोना दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकों अजय पाटील अमोल भोसले, शरद पाटील हे घटनास्थळी हजर होऊन ताब्यातील इसमास पोलीस स्टेशनला हजर केले होते.

तन्वीर शेख यांच्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पो.स्टे. येथे गुरनं.462/2023 भादवि कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात ताब्यातील आरोपी एकनाथ चव्हाण रा. लोंजे ता.चाळीसगाव याकडे सखोल चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात त्याचा मित्र गणेश जयराम चव्हाण याने प्रोत्साहन तसेच मदत केल्याची माहिती दिली. तरी सदर गुन्ह्यात गणेश चव्हाण याचा सहभाग निष्पन्न झाल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी त्यास तात्काळ शोध घेणेकामी मार्गदर्शन व सुचना देऊन आदेशीत केले होते.

त्याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोउपनिरीक्षक सुहासआव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकॉअमोल भोसले, शरद पाटील, गणेश कुवर, निलेश पाटील, मोहन सुर्यवंशी, नंदु महाजन, प्रविण जाधव . विनोद खैरणार यांनी गणेश चव्हाण याचा त्याचे राहते गावी शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. सदर आरोपी मा. न्यायालयासमोर हजर करून सध्या न्यायालयीन कस्टडी मध्ये आहेत.

तसेच सन 2021 मध्ये पिर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ फिर्यादी नामे मोहम्मद आसिफ इसा शहा यांची 2,800000/- रुपये किंमतीची रिक्षा चोरीस गेली होती. त्याबाबत चाळीसगाव शहर पो.स्टे. येथे गुरनं. 279/2021 भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पो.स्टे. कडुन कसोशीने करण्यात येत होता. सदर गुन्हा हा आरोपी नामे शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार वय52 रा अब्दुल खालीक नगर, सर्वे नं 42(A) प्लॉट नं33 नया ईस्लामपुरा, मालेगाव जि नाशिक याने केल्याची माहिती पो.ना. दिपक पाटील यांना प्राप्त झालेली होती.

सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याकडे सखोल चौकशी करता त्याने रिक्षा चोरीबाबत कबुली देऊन सदरची रिक्षा काढून दिलेली आहे. सदर आरोपीतास दि. 25/09/ 2023 रोजी अटक करण्यात आलेली असुन मा.न्यायालयाचे आदेशाने सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने मोटार सायकलस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहन यांच्याकडेस मदत मागून त्यांनी लिफ्ट दिली असता त्यांना विश्वासात घेऊन त्यांना गुंगीकारक औषध मिश्रीत कचोरी, पेढे असे खाऊ घालून ते बेशुध्द होताच त्यांच्या ताब्यातील रिक्षा किंवा मोटार सायकल चोरी करुन पळ काढत असे.

सदर आरोपीविरुध्द खुलताबाद, मालेगाव व इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर वरिल दोन्ही गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध हा मा. पोलीस अधिक्षक सो. एम राजकुमार मा. अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीसांनी घेतला असुन सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोना दिपक पाटील व पोका अमोल भोसले करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार