पावसेचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात युवा व्यावसायिक म्हणून त्याने लौकिक मिळवला होता.
कवठेएकंद : येथे गणपती विसर्जनावेळी तरुणाचा मृत्यू झाला. कर्णकर्कश आवाजामुळे घटना घडल्याची चर्चा आहे. शेखर सुखदेव पावशे (वय ३२, कवठेएकंद) असे त्याचे नाव आहे. पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. दरम्यान, समाज माध्यमांवर कर्ककर्कश आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणांविरोधात टीकेची झोड उठली आहे. पोलिस काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे. येथे काल रात्री अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका झाल्या. मिरवणुकीनिमित्त उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणा लावल्या होत्या. तरुणाई नाचत होती.
काल सायंकाळी सातपासून चौकाचौकांत दणदणाट सुरू होता. विसर्जन मिरवणुकीत पावसेही गेला होता. रात्री बसथांबा चौकात मिरवणुका आल्यानंतर ईर्षा सुरू झाली. धडकी भरवणाऱ्या आवाजामुळे अनेकांना त्रास झाला. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पावसेला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पावसेचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात युवा व्यावसायिक म्हणून त्याने लौकिक मिळवला होता. काही वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. चार वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी मिरवणुकीतील आवाजावर नियंत्रणासाठी सुरवातीलाच पावले उचलायला हवी होती, अशी चर्चा आहे. आता तरी पोलिसांनी तालुक्यातील कर्णकर्कश आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणेवर कठोर कारवाई करावी.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






