पाटणा (बिहार) :- दलित महिलेला नग्न करत अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर महिलेला आरोपींनी मलमूत्रही पाजलं. आरोपींमध्ये बाप आणि लेकाचा समावेश आहे.कर्जाची परतफेड केल्यानंतरही आरोपी महिलेकडे अधिक पैशांची मागणी करत होते. महिलेने मात्र पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळेच आरोपींनी रात्री तिच्या घरात घुसून हे धक्कादायक कृत्य केले.
आरोपींनी केलेल्या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद सिंग आणि त्याचा मुलगा अंशू आपल्या चार साथीदारांसह महिलेच्या घरात घुसले होते. रात्री 10 वाजता आरोपी महिलेच्या घरात घुसले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेले होते.
महिलेला घरी नेल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केली. महिलेला काठीने मारहाण करण्यात आला. यानंतर तिला नग्न केलं. इतकंच नाही तर प्रमोद सिंग याने आपल्या मुलाला महिलेच्या तोंडात मूत्रविसर्जन करण्यास सांगितलं. पण पीडित महिला तेथून पळ काढण्यात यशस्वी झाली. महिलेने पळ काढला आणि आपलं घर गाठलं. पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने काही महिन्यांपूर्वी प्रमोद सिंग याच्याकडून व्याजावर 1500 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. महिलेने व्याजासह हे सगळे पैसे परत केले होते. पण यानंतरही आरोपी महिलेकडून पैसे मागत होते. पण महिला पैसे देण्यास नकार देत होती.
प्रमोद सिंगने महिलेला जर पैसे दिले नाही तर तुला नग्न करुन गावात फिरवेन अशी धमकी दिली होती. महिलेने पोलिसांकडे या धमक्यांबद्दल तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. पीडित महिलेचं कुटुंब आणि दलित समाज आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






