ब्रेकिंग न्यूज: एरंडोल शहरातील एक मंडळ वगळता सर्व गणपती मंडळांवर गुन्हे दाखल.

Spread the love

एरंडोल:- दिनांक 28/09/2023 रोजी एरंडोल शहरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी 04.45 वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली होती. एरंडोल शहर तसेच शहराचे गांधीपुरा भागातील क्रमांक 01 ते 18 सार्वजनिक मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते. त्यातील 16 व्या क्रमांकाचे हरीपुरी गणेश मित्र मंडळ, अमळनेर दरवाजा एरंडोल यांनी कोणतेही वाहन न वापरता फक्त श्री. गणेश मुर्ती विसर्जनात सामिल केली होती.

त्यातील क्रमांक 1) जयगुरु व्यायाम शाळा (गाढवेगल्ली) एरंडोल, अध्यक्ष अजय साहेबराव महाजन, 2) जय सावता माळी गणेश मंडळ (माळीवाडा) एरंडोल, अध्यक्ष- योगेश कैलास महाजन 3) बालवीर गणेश मंडळ (रुबेदारमढी) एरंडोल, अध्यक्ष अनिल केशव महाजन, 4) जयहिंद गणेश मंडळ (गांधीपुरा) एरंडोल, अध्यक्ष- अरविंद प्रभाकर सोनार, 5) बालमित्र गणेश मंडळ (जहांगीरपुरा) एरंडोल, अध्यक्ष- कुंदन शांताराम चौधरी 6 ) माहेश्वरी गणेश मंडळ (मारवाडी गल्ली) एरंडोल, अध्यक्ष- यश राजीव मणियार, 7) नम्रता गणेश मंडळ (देशमुखमढी) एरंडोल, अध्यक्ष नितीन जगन्नाथ महाजन, 8 ) अखिल ब्रम्हवं नवयुवक गणेश मंडळ (ब्राम्हणओटा) एरंडोल, अध्यक्ष- अल्केश नंदकिशोर जोशी,

9) सर्वोदय गणेश मंडळ 4 (कुभारटेक) एरंडोल, अध्यक्ष- भुषण अनंत पाटील, 10) छत्रपती शिवाजी महाराज मंडळ (गांधीपुरा) एरंडोल, अध्यक्ष- अतुल सुभाष मराठे, 11) ज्ञानदिप मित्र मंडळ (भोई गल्ली) एरंडोल, अध्यक्ष- मंगेश विलास भोई, 12 ) नागराज मित्र मंडळ (नागराज चौक) एरंडोल, अध्यक्ष- अमोल सुरेश महाजन, 13) चौक गणेश मंडळ (मेनरोड) एण्डोल, अध्यक्ष- चेतन अनिल बडगुजर, 14 ) संताजी मित्र मंडळ (चौधरी वाडा) एरंडोल, अध्यक्ष- संजय नारायण चौधरी, 15) जय बजरंग मित्र मंडळ (पाताळ नगरी) एरंडोल, अध्यक्ष- विक्रांत जगदीश साळी, 17) श्रीराम गणेश मंडळ (गुजर गल्ली) एरंडोल, अध्यक्ष- विठ्ठल बाबुराव पाटील, 18) बालाजी मित्र मंडळ (बालाजी मढी) एरंडोल, अध्यक्ष- योगेश ताराचंद महाजन या मंडळाचे अध्यक्ष यांनी सदर विसर्जन मिरवणुक किती वाजता संपवावी,

विसर्जन मिरवणुकीमध्ये कशा प्रकारे वर्तन करावे याबाबत त्यांना Cr.P.C. 149 नोटीस प्रमाणे लेखी होत्या. सूचना ‘देण्यात आल्या तरी देखील वर नमूद गणेश मंडळाचे अध्यक्ष, मंडळातील सहभागी सदस्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री 12.00 वाजेनंतर वाद्य बंद करण्यासाठी पोलीसांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून पोलीसांना त्यांचे सार्वजनिक कार्य पार पाडत असतांना त्यांना अटकाव निर्माण केला व गणपती विसर्जन मिरवणुक दिलेल्या वेळेत पूर्ण न करता रात्री 12.00 वाजेनंतर देखील मिरवणुकी मध्ये ढोल ताशे, बँन्ड व इतर पारंपारीक वाद्ये दिनांक 29/09/2023 रोजी पहाटे 04.30 वाजेपर्यंत वाजवुन पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे तसेच मा. जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे आदेश क्रमांक दंडप्र-01/कावि/13/2023 दिनांक 16/01/2023 अन्वये दिलेल्या लेखी आदेशाचे उल्लंघन केले

याबाबत मी खात्री केली आहे. म्हणुन माझी गणेशोत्सव सण 2023 व ईद ए मिलाद सण 2023 यांचा बंदोबस्त आटोपुन आज रोजी वरील क्रमांक 01 ते 15, 17, 18 गणपती मंडळांचे अध्यक्ष व सदस्य यांचेविरुद्ध भादवि कलम 186, 188, 34, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 चे उल्लंघन कलम 134 प्रमाणे एरंडोल पोलीस स्थानकात मिलिंद कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हे पण वाचा

टीम झुंजार