कानपूर :- २३ वर्षीय तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत दोघांनीही शरीरसंबंध ठेवले. मात्र, अचानक प्रेयसीची मैत्रीण पाठीमागच्या खोलीतून आली.तिने दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितलं. माझ्यासोबतही शरीरसंबंध ठेव अशी मागणी प्रेयसीच्या मैत्रिणीने तरुणाकडे केली. तरुणाने या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने तरुणाचा प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केला.
या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याने घटनास्थळावरुन पळ काढत आपलं घर गाठलं. त्यानंतर आई वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर शहरातील रौतापूरकला गावात राहणाऱ्या विवाहित महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे ती एकटीच राहत होती. दरम्यान, महिलेचे आपल्याच गावातील तरुणासोबत सूत जुळले. याकाळात दोघांनी अनेकदा शरीरसंबंध देखील ठेवले. रविवारी रात्री देखील महिलेने तरुणाला फोन करुन घरी बोलावून घेतले.
वासनेपोटी तरुण मध्यरात्रीच्या सुमारास महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. यावेळी महिलेने तिच्या मैत्रिणीलाही घरी बोलावले होते. ज्याची माहिती तरुणाला नव्हते. दरम्यान दोघेही शरीरसंबंध ठेवत असताना महिलेची मैत्रिण त्याठिकाणी आली. आपल्यासोबत देखील शरीरसंबंध ठेव, अशी मागणी तिने तरुणाकडे केली. मात्र, तरुणाने या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने किचनमधील चाकू उचलला आणि तरुणाचा प्रायव्हेट पार्टवर वार केला. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली.
त्याने घटनास्थळावरुन पळ काढत आपलं घर गाठलं. मुलाला रक्तबंबाळ असल्याचं पाहून तरुणाच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सकरली. त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने रौतापूरकला गावात खळबळ उडाली. घटनेनंतर तरुणाची प्रेयसी प्रचंड घाबरली. तिने तातडीने फोन करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाची विचारपूस केली. मात्र, बदनामीच्या भीतीने त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






