Viral Video: दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केवळ पुरुषच नाही तर मोठ्या संख्येनं महिलाही जराही न घाबरता चोरी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक थक्क झाले आहेत.
व्हिडिओमध्ये एक महिला दिसत आहे, जी चोरीच्या उद्देशाने दागिन्यांच्या दुकानात घुसली होती. महिलेनं आधी दुकानदाराला काही दागिन्यांच्या वस्तू दाखवण्यास सांगितलं.
त्याने दागिने बाहेर काढले आणि दाखवण्यासाठी टेबलावर ठेवायला सुरुवात केली तेव्हा महिलेनं त्याच्या डोळ्यावर पेपर स्प्रे फवारला आणि दागिने घेऊन पळून जाऊ लागली. पेपर स्प्रे फवारताच महिला टेबलावर ठेवलेले दागिने घेऊन पळू लागली. मात्र, त्यानंतर त्या व्यक्तीने धावत येऊन महिलेला दुकानातच पकडलं. महिलेला पकडल्यानंतर दुकानदाराने तिला मारायला सुरुवात केली. हे पाहून दुकानात उपस्थित असलेला अन्य एक व्यक्ती लगेचच धावत आला.
हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता ही घटना कुठे घडली हे कळू शकलेलं नाही. मात्र, पकडल्यानंतर महिलेला चांगलाच धडा शिकवला गेला असावा, असं निश्चितपणे मानलं जाऊ शकतं.या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटलं की, ‘कधीकधी कठोर आणि क्रूर असणं हे स्वसंरक्षणासाठी चांगलं असतं.’ तर दुसर्या युजरने म्हटलं की, ‘जे महिला असण्याचा गैरफायदा घेतात त्यांच्यासोबतही असंच व्हायला हवं.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






