एरंडोल :- शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये धार्मिक भावना दुखावणा-या घोषणा दिल्यावरून जुलूसच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम समाजाच्यावतीने शहरातून ईद-ए-मिलाद निमित्त दुपारी गांधीपुरा पासून शहरातील प्रमुख मार्गावरून जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती.जुलूसमध्ये हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.जुलूसमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी धार्मिक भावना भडकतील अशा विविध घोषणा दिल्या
होत्या.
प्रशासनाने जुलूस मिरवणूकीबाबत लेखी सुचना दिल्यानंतर देखील शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून धार्मिक भावना दुल्खावातील अशा घोषणा दिल्यामुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जुलूसमध्ये सहभागी झालेले युवक शहरातील काही मोजक्या ठिकाणी “गुस्ताख ए नबी की एक हि
सजा,सर तन से जुदा,सर तन से जुदा” यासह अनेक घोषणा जोरजोरात देत होते.याबाबत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत हवालदार मिलिंद
कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून
जुलूसचे आयोजक शेख आरिफ शेख मजीद,सय्यद अहमदअली जाफरअली, अब्दुल शकूर अब्दुल लतीफ, शेख सत्तार शेख इब्राहीम, शाकीरखान अहमदखान सर.रा.एरंडोल यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






