एरंडोल :- येथील पांडवनगरी उत्सव समितीच्यावतीने पांडववाड्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात
आली.महाआरतीस युवक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.महाआरती शांततेत पार पडली. पांडवनगरी उत्सव समितीच्यावतीने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.उत्सव समितीतर्फे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापू मियां यांना भव्य मिरवणूक काढून भगवी
चादर चढविण्यात येत असते.
पांडव वाड्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरासमोर उत्सव समितीच्यावतीने महाआरतीचे आयोजन करण्यात येत असते.काल (ता.३०) रात्री आठ वाजता शहरातील विविध राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि महिला लोकप्रतिनिधी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढून विद्युत रोषणाई करण्यात आली होती.महाआरतीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.यामध्ये महिला आणि युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
ग्रामीण भागातून देखील भाविक सहभागी झाले होते.शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील भाविक गटागटाने आरतीमध्ये सहभागी झाले होते. महाआरतीमुळे विठ्ठल मंदिर परिसर आणि परदेशी गल्ली परिसरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाआरती शांततेत पार पडली.यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,सतीश परदेशी,डॉ.नरेंद्र पाटील,शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, आर डी पाटील,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,भाजपाचे शहरप्रमुख निलेश परदेशी,तालुका सरचिटणीस अमोल जाधव,
advt.महेश काबरा,बाबाजी परिवाराचे प्रमुख संजय पाटील,भरत महाजन,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,शोभना साळी,आरती परदेशी, प्रसाद दंडवते, advt.प्रेमराज पाटील,advt.ज्ञानेश्वर महाजन, advt.दिपेश पांडे,सतीश पल्लीवाल,अरुण साळी यांचेसह हजारो भाविक उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांनी पोलीस आणि गृहरक्षक दलाचा बंदोबस्त चोख ठेवला होता.महाआरतीस हजारो भाविकांमध्ये युवक आणि युवतींची संख्या लक्षणीय असल्यामुळे युवक वर्ग मोठ्या संख्येने धार्मिकतेकडे वळत असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केले.






