प्रतिनिधी l एरंडोल
:-वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणा-या वाळू माफियांकडून निवासी नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,अलाठी आणि पथकातील महसूल कर्मचा-यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आज रात्री एक वाजेच्यानसुमारास चोरटक्की गावाजवळ घडली.यावेळी महसूल पथकाने जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर वाळूमाफिया व त्यांच्या सहका-यांनी वाळू रस्त्यावरच उपसून पळवून
नेले.वाळू माफियांच्या दहशतीमुळे महसूल कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की उत्राण,रिंगणगाव, दापोरी. हणमंतखेडे सीम या गावाजवळ असलेल्या गिरणा नदीच्या पात्रातून वाळूमाफियांकडून दररोज वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते.वाळूचोरीस आळा घालण्यासाठी महसूल कर्मचा-यांचे फिरते पथक दररोज या परिसरात रात्रीची गस्त घालत असतात.आज
रात्री एक वाजेच्या सुमारास निवासी नायब तहसीलदार किशोर माळी,मंडळ अधिकारी मनोज शिंपी,तलाठी सलमान तडवी,सुरेश कटारे,श्रीकांत कासंदे,बालाजी
लोंढे,अतुल तागडे,सुधीर मोरे यांचे पथक रात्रीची गस्त घालत असतांना
पथकास कांताई बांधा-याजवळ वाळूने भरलेले ट्रॅक्टर आढळून आले.पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव सागर श्रीराम गवळी व मालकाचे नाव श्रीराम गवळी असल्याचे सांगितले. पथकाने ट्रॅक्टर जप्त करून एरंडोल पोलीस स्थांनकात जमा करण्यासाठी आणत असतांना चोरटक्की गावाजवळ समाधान सोनवणे व त्यांच्या सहका-यांनी ट्रॅक्टर समोर बोलेरो गाडी उभी करून थांबले.समाधान सोनवणे व त्यांच्या सहका-यांनी महसूल पथकावर दगडफेक करून पथकातील सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी समाधान सोनवणे व त्याच्या सहका-यांजवळ काठ्यांसह अनेक घातक शस्त्र होते.तसेच मोटार सायकलवर आलेल्या चार जणांनी शासकीय वाहनावर
दगडफेक केली.समाधान सोनवणे व त्यांच्या सहका-यांनी केलेल्या मारहाणीत महसूल कर्मचा-यांना मुका मार लागला आहे.महसूल पथकाच्या ताब्यातील ट्रॅक्टर
मध्ये असलेली वाळू रस्त्यावरच खाली करून समाधान सोनवणे व त्याच्या सहका-यांनी ट्रॅक्टर पळवून नेले.महसूल पथकातील सदस्यांनी घडलेल्या घटनेची
माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दिली.
तहसीलदार सुचिता चव्हाण व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खेडी गावात जाऊन आरोपींचा शोध घेतला.महसूल व पोलीस पथकास खेडी येथे तीन वाळू भरणारे मजूर
साहित्यासह तसेच महसूल पथकाचा पाठलाग करणारे वाहन आढळून आले.पोलिसांनी पाठलाग करणारे वाहन व मालक यांना ताब्यात घेतले आहे.याबाबत निवासी नायब तहसीलदार किशोर माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून समाधान सीताराम सोनवणे यांचेसह अन्य सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






