बॅरिस्टर पदवी मिळवल्या बद्दल उमर कमाल फारूकी यांचा सत्कार

Spread the love

जामनेर(प्रतिनिधी) :- लंडन येथून आंतरराष्ट्रीय विधी सेवेची बॅरिस्टर पदवी प्राप्त केल्या बद्दल उमर कमाल फारूकी यांचा नागरी सत्कार करण्यात आला.या वेळी विविध मान्यवरांनी मानवी जीवनावर शिक्षणाचे वैशिष्ट्य यावर मार्गदर्शन केले.

सत्कार मूर्ती बॅरिस्टर उमर कमाल फारूकी यांनी सत्कार स्वीकारच्या भाषणांत बोलताना आभार प्रकट करून आपला पूढील जीवन हे मानवी कल्याणासाठी जगणार असुन आपण घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून घरोघर शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी राज्यभराचा दौरा करून जागरूकता निर्माण करीत आहोत व या मिशनमध्ये प्रत्येकाने सामिल होऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन जननायक फाऊंडेशनच्या वतीने अशफाक पटेल यांनी केले तर जमील खान,माजी उपनगराध्यक्ष जाविद मुल्लाजी व नगर सेवक नाजिम पार्टी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रफीक मौलाना होते.

प्रमुख पाहूणे म्हणून कमाल फारूकी,करीम सालार,मनव्वर खान,इल्हाजुद्दीन फारूकी,ए.एम देशमुख आदी होते.सामाजिक स्तरावरून अनेक मान्यवरांकडून बँरिस्टर फारूकी यांचे अभिनंदन केले जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार