बदायूं :- उत्तर प्रदेश राज्यातील बदायूंमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे एका गर्भवती महिलेने पतीला सोडून चक्क एका तरुणीशी मंदिरात लग्न केले. या अनोख्या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
एका कपड्याच्या दुकानात काम करताना दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. कालातंराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान सोशल मीडियावर दोन महिलांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे.
समलैंगिक विवाहाचे हे प्रकरण बदायूं जिल्ह्यातील दातागंज कोतवाली क्षेत्रातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन वेगवेगळ्या गावात राहणाऱी तरुणी व गर्भवती महिला परिसरातील एका कपड्याच्या दुकानात एकत्र काम करत होत्या. यावेळी दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघी एकमेकींवर प्रेम करू लागल्या. आपले प्रेम कायम ठेवण्यासाठी दोघींनी बरेली शहरातील एका मंदिरात विवाह केला. त्यांनी कुंकू लावतानाचा व वरमाला घालतानाचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दातागंजमध्ये समलैंगिक विवाहावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ही महिला विवाहित असून सध्या ती गर्भवती आहे. असेही म्हटले जात आहे की, समलैंगिकता गुन्हा नाही, मात्र समलैंगिक विवाहाबाबत अजून कोणताही कायदा बनवला गेला नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या प्रकाराविषयी त्यांना कोणतीही सूचना मिळालेली नाही.
याविषयी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. जर कोणी तक्रार केली तर चौकशी केली जाईल. २०१८ मध्ये सरकारने समलैंगिक संबंधांना मान्यता दिली होती. सुप्रीम कोर्टाने २०१८ मध्ये समलैंगिक संबंधांबाबत लावण्यात येणारे आयपीसी कमल ३७७ ला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढले होते. मात्र समलैंगिक विवाहबाबत अजूनही वाद सुरू आहे. याबाबत अजून कोणताही कायदा किंवा आदेश जारी केलेला नाही.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






