ब्रेकिंग न्यूज: जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर घोषणा व शहराची शांतता भंग करणाऱ्या 39 जणांवर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल:- शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये पांडव वाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर जीवे ठार मारण्याच्या व चितावणीखोर घोषणा दिल्या त्याबद्दल एरंडोल पोलीस स्थानकात 39 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम समाजाच्यावतीने शहरातून ईद-ए-मिलाद निमित्त दुपारी गांधीपुरा पासून शहरातील प्रमुख मार्गावरून जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती. जुलूसमध्ये हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

जुलूसमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी पांडव वाडा संघर्ष समितीचे संयोजक प्रसाद दंडवते यांचे घरासमोरील रोडवर थांबली असता मिरवणुकीतील आरोपी क्रमांक 1 व 2 याच्या नेतृत्वात व चिथावणी वरुन आरोपीतांनी झेंडे काढून काठ्या व पाईप जमीनीवर आपटुन प्रसाद दंडवते यांना उद्देशुन साले प्रसाद बाहर निकल, घर में क्या बैठा है, जुम्मा मशीद जिंदाबाद, जुम्मा मशीद छुडवायेंगे तसेच जातीयवादा वरुन गुस्ताख ए नबी की एक ही सजा सर तन से जुदा, सर तन से जुदा, घर से निकालेंगे अल्लाहु अकबर कहलवाऐंगे अशा प्रसाद दंडवते यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने धमकी देणाऱ्या, चिथावणीखोर घोषणा या तसेच हिंदु समुदायास संविधानाने मिळालेल्या धर्माचे अनुसरण करुन मिळणाऱ्या जिवीताच्या अधिकाराच्या विरुद्ध होत्या.

तसेच शहरातील मिरवणुक मार्गावरील हिंदु समाजाच्या लोकांमध्ये जातीय द्वेष भावना व शत्रुत्व वाढीस लावणाऱ्या व जनसमुदायात एकोपा टिकविण्यास बाधक होत्या. याबाबत पांडव वाडा संघर्ष समितीचे संयोजक प्रसाद दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 39 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) असलम रशीद पिंजारी, 2) असलम पिंजारीचा भाऊ साहील पिंजारी 3) जमीर खान सलीम खान, 4) सलमान पठाण, 5) एजाज मेंबर (नगरसेवकाचा भाऊ नाव माहित नाही), 6) मोहसीन पिंजारी, 7) शाहरूख इस्माईल पिंजारी, 8) कामिल पिंजारी, 9) शाहरूख पठाण, 10) मोहसीन अजित पिंजारी, 11) जमील शबीर पिंजारी, 12) लाड्या चा भाऊ समीर शरीफ पिंजारी, 13) शोएब खान फिरोज खान पठाण,

14) समीर मेहमूद पिंजारी, 15) समीर पिंजारी, 16) इम्रान सय्यद, 17) राहीन शेख रशीद शेख, 18) जुबेर पिंजारी, 19) परवेज पिंजारी, 20) आवेश पिंजारी, 21) लड्डू शकील पिंजारी, 22) साहिल जहागीर पिंजारी, 23) इबा बशीर पिंजारी, 24) अबरार पठाण, 25) उस्मान पठाण, 26) वासिम पिंजारी, 27) फारूक शेख मुल्ला वाडा, 28) समीर शेख नुरा, 29) यासीन खान, 30) सादिक पिंजारी, 31) रमजान पिंजारी, 32) फैझल मेहमूद पिंजारी, 33) जाकीर खान, 34) अकिल, 35) भैय्या रशीद पिंजारी, 36 ) हकीम पठाण, 37) इरफान शेख मुल्ला वाडा, 38) सलीम चा भाऊ मुल्ला वाडा (पत्रकार), 39) मजहर खान मुल्ला वाडा सर्व रा. एरंडोल.

अश्या 39 जणांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात भादवी कलम 153(अ)(ब),109,143,506 प्रमाणे गुन्हाची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे पुढील तपास करीत आहे

हे पण वाचा

टीम झुंजार