Viral Video :चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; “ये मुंबई है मेरी जान” पहा धक्कादायक व्हिडिओ.

Spread the love

Viral Video : मुंबई लोकलच्या एका महिला डब्यामधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ठिकाणी महिला भगिनी धावती लोकल पकडतांना पाहायला मिळत आहेत.यामुळे या व्हिडिओवर मुंबईकर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मुंबई लोकलमध्ये नेहमीच आपण वेगवेगळे व्हिडियो व्हायरल होत असतांना पाहत असतो.यातच सध्या मुंबई लोकल मधला एक व्हिडियो व्हायरल होतांना दिसत आहे. हा व्हिडियो अक्षय कटारिया नावाच्या मुलाने पोस्ट केला आहे. यात त्याने आपल्या ट्विटरवर व्हिडीयो शेअर केला आहे. यात लोकल थांबायच्या आधीच त्यामध्ये महीला चढत आहेत आणि मागे ‘ये मुंबई है मेरी जान’ हे गाणं लावलं आहे. तब्बल दोन मिलियन लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपापली मतं व्यक्त करत आहेत. काहींच्या मते त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ते हे करत आहेत. तर ऑफिस नंतर पुन्हा ट्रेनमध्ये उभे रहा ही साधी गोष्ट नसल्याचे म्हणत त्यांची बाजू लोकांनी घेतली आहे.दुसरीकडे अशा प्रकारे आपल्या जीवाचा खेळ करू नये असे मत काहींचे आहे. आपला जीव महत्वाचा आहे. यामुळे त्याची काळजी घेतली पहीजे आहे. असे काहींचे मत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार