धक्कादायक| मैंत्रीसंबंधातून काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविकेवर केला वेळोवेळी बलात्कार.

Spread the love

पिडीत नगरसेविकेकडून दहा लाखही उकळले, मारहाण करून आणखी पैशांची करीत होता मागणी.
पुणे :- मैत्रीसंबंधातून काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३९ वर्षीय एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काकडे हा काही वर्षांपुर्वी नगरसेविकेच्या घरी कामाला होता. पीडीत नगरसेविकेचे व त्याची ओळख होती. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. दरम्यान, त्याने मैत्रीतून काढलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करतो, अशी धमकी काकडे याने नगरसेविकाला दिली. त्यानंतर त्याने धमकावून नगरसेविकेवर वेळोवेळी बल्ताकार केला.
२०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे अत्याचार करत होता.

नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी त्याने १० लाख रुपयेही उकळले. त्यानंतर काकडे नगरसेविकेला धमकावत होता. मैत्रीसंबंधाबाबत माहिती देतो, असे सांगून तिच्याकडून आणखी पैशांची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी काकडे तिच्या घरी आला. तु दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार