Viral Video: दोन मुलीं स्कूटीने जातांना खाली पडल्या मदत करण्यासाठी तरूण धावला, पुढे असं विचित्र झालं पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: असं म्हणतात की जर कोणी अडचणीत असेल तर त्याला नक्कीच मदत करावी. पण अशा प्रकारे मदत करू नका, की समोरच्याचा त्रास आणखीच वाढेल. तुम्ही पाहिलं असेल की अनेक वेळा लोकांचा रस्त्यावर अपघात होतो आणि त्यांच्या मदतीला अनेक लोक धावून येतात. काही लोक जखमींना उचलण्याचं काम करतात तर काही त्यांना रुग्णालयात नेण्यात मदत करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर रस्ता अपघाताशी संबंधित एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल.

खरं तर, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटीवरून पडलेल्या दोन मुलींना मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु त्याची मदत मुलींसाठी इतकी मोठी समस्या बनली की त्यांनीही डोक्याला हात लावला असेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नदीच्या काठावर एक कार उभी आहे आणि समोरून स्कूटीवरून दोन मुली येतात पण स्कूटी चालवणारी मुलगी गाडीसमोर स्कूटी थांबवताच तिचा तोल गेला आणि नंतर दोन्ही मुली तिथे पडल्या.

यानंतर दुरून एक माणूस त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यांची स्कूटी उचलू लागला. मात्र स्कूटी उचलताच त्याचा हात एक्सलेटरवर गेला आणि त्यानंतर तो स्कूटीसह थेट पाण्यात जाऊन पडला. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Bihar_se_hai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ‘ही कसली मदत आहे भाऊ?’ असं विनोदी कॅप्शन देण्यात आलं आहे.

अवघ्या 23 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 73 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर विविध रंजक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘अशी मदत कोण करतं भाऊ?’, तर एका महिला यूजरने लिहिलं आहे की, माझ्यासोबतही असंच काहीसं घडले आहे. आणखी एका युजरने लिहिलं, ‘पैसे देऊन ड्रायव्हिंग लायसन्स काढल्यावर असंच होतं’

हे पण वाचा


टीम झुंजार