एरंडोल :- शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद काळात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हिंदू आणि मुस्लीम समाजातील प्रमुख पदाधिका-यांची
बैठक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती.शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.तसेच ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये समाजकंटकांनी केलेल्या कृत्याचा मुस्लीम समाजाच्या पदाधिका-यांनी निषेध करून झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली.
शहरात यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी सर्वांनी प्रयत्न करून समाजकंटकांची माहिती पोलिसांना कळविण्याच्या निर्णय घेण्यात आला.शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाने गणेश मंडळाच्या पदाधिका-यांवर दाखल केलेले गुन्हे तसेच ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसच्या आयोजकांवर दाखल करण्यात आलेले
गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून गुन्हा बाबत चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय
यावेळी घेण्यात आला.
जुलूसमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी आणि समाजकंटकांनी पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर घातलेला धुडगूस,त्यांना देण्यात आलेली जीवे ठार मारण्याची धमकी,त्यांच्या घरावर फेकण्यात आलेल्या बाटल्या,तसेच देण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणा आदी घटनांचा मुस्लीम समाजाच्या पदाधिका-यांनी निषेध केला आणि झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली.शहरात यापुढे अशा घटना घडणार
नाहीत अशी ग्वाही मुस्लीम समाजाच्या पदाधिका-यांनी दिली.
पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या पाठीमागे हिंदुत्ववादी संघटनांसह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी ठामपणे उभे असल्याचे यावेळी
पदाधिका-यांनी जाहीर केले. मुस्लीम समाजातील पदाधिका-यांनी समाजविघातक कृत्य करणा-या समाजकंटकांना प्रतिबंध घालण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करून त्याचे होणारे दुष्परिणाम याची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले.हिंदू व मुस्लीम समाजबांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच
आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडीयावर टाकू नये असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt. किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,दशरथ महाजन,किशोर
निंबाळकर,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,प्रा.शिवाजीराव अहिरराव,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील,anglo उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,माजी नगरसेवक एजाज अहमद,सलीम शेख शहाबुद्दीन
कागदी,साहित्यिक जाकीर सय्यद,नुरोद्दीन सय्यद,लतीफ मिस्तरी,कमरअली सय्यद,शेख शफिक रहीम शेख शेख,शकील पिंजारी,जमील शेख,जावेद मुजावर यांचेसह दोन्ही समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






