नागपूर (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य निरीक्षक महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष खरटमोल यांनी राज्यस्तरीय महायोगोत्सव २०२३ नागपूर साठी नागपूर येथे जाऊन पाहणी दौरा केला.
यादरम्यान नागपूर टीमकडून प्रसाद कुलकर्णी आणि संतोष खरटमोल यांचे मोठया आनंदात स्वागत करण्यात आले. डॉ. हेडगेवार भवन येथे २८-२९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय महायोगोत्सवच्या कार्यक्रम स्थळी भेट देऊन त्याची पाहणी करण्यात आली. यात सभागृह व्यवस्था, गेस्ट रूम, सदस्य बैठक व्यवस्था, साधकांची दोन दिवस राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मान्यवरांच्या व्याख्याअचे आयोजन कशाप्रकारे करता येईल याच्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर टीमकडून होणाऱ्या महायोगोत्सव मधील कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यस्तरीय महायोगोत्सव मधील प्रत्येक समितीच्या कामाची विभागणी करून देण्यात आली.
प्रत्येक समितीच्या प्रमुखाला रीतसर मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी आणि सदस्य हे अगदी जोमाने काम करीत आहेत, हे त्यांच्या कामाचा आढावा घेताना दिसून आले. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष विनायकजी बारापत्रे, राज्य महासचिव अमितजी मिश्रा, नागपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी थोटे, स्थानिक नियोजन समिती अध्यक्षा लता होलगरे, कोषाध्यक्षा उषा हिंदोरीया, उपाध्यक्षा सुवर्णा पाल, मनोहर पाल, श्री. ढोबळे, श्री. जांभूळकर यांच्यासह पन्नासहून अधिक सदस्य उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






