चाळीसगांव :- शहर पोलीसांकडुन मागील काही दिवसांपासुन नशामुक्त चाळीसगाव शहर हे अभियान राबवण्यात येत आहे त्यात प्रथम चाळीसगाव नगरपालीकेचे मदतीने अवैध दारु विक्रेत्यांचे गुत्ते हे नष्ट करण्यात आले होते. सोबतच पोलीसांनी चायनीज सेंटर/सोडा वॉटर, स्टॉल/अंडा भुर्जी विक्रेते यांचेवर शहरात परिणामकारक गस्त ठेवून सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास नागरिकांना बसू न देण्यासाठी कार्यवाही करण्यात आली होती. तसेच शहरातील हॉटेल व बार विक्रेते यांची पोलीस स्टेशनला मिटींग घेवून त्यांना वेळेत त्यांचे हॉटेल व बार बंद करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या
तसेच सदर आवाहनाला न जुमानणाऱ्या बार आस्थापनांना मुंबई पोलीस कायदा कलम 33 (w) अन्वये दंडात्माक कारवाई करण्यात आली होती, अवैध रित्या अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्यांविरुध्द 02 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच सेवनकरना-यांवर 03 गुन्हे चाळीसगाव शहर पो स्टे ला मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे, मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त चाळीसगाव शहर हया संकल्पनेस तडा देणाऱ्या अंमली पदार्थ वाहतुकीवर व विक्री करणारे इसमांवर वेळीच कार्यवाही करणेकामी पथक तयार करण्यात आले आहे.
आज रोजी सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक, नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे शासकीय वाहनाने सुप्रभात गस्त करीत असतांना त्यांना चाळीसगांव शहरातील कोतकर कॉलेज जवळ सकाळी 05.45 वाजता एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कार क्रमांक MP 09 WC 1485 हिच्यावर संशय बळावल्याने कार चालकास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने इशाऱ्यास न जुमानता भरदाव वेगाने कार नेली ..गस्तीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ एकमेकांना संपर्क करून चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन कार अडवण्याचा प्रयत्न केला..
सदर वाहन चालक यास पळून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने तो सदरचे वाहन रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का जवळ वाहन सोडून पळून गेला ..सदर कारच्या चालकाच्या बाजुस असलेल्या मागील दरवाजाच्या फुटलेल्या काच मधुन पाहीले असता नमुद कारमध्ये गोण्या व गोण्यांच्या बाजुला अफुची बोंडे व बोंडाचा चुरा पडलेला दिसत असल्याची खबर दिल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती देऊन ते हजर होताच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची लेखी परवानगी घेवुन, तसेच लागलीच पोलीसांनी दोन शासकीय पंच, वजन मापे निरीक्षक, असे पोलीस स्टेशनला बोलावून पोलीसांचे एक पथक तयार करुन, सदर कार मधील मुद्देमालाची पाहणी केली असता
त्यात 1 क्विंटल, 80 किलो, 240 ग्रँम वजनाच्या 18,02,400/- रुपये किमतीच्या एकुण 09 गोण्या त्यामध्ये अफुची बोंडे व बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) तसेच 10,00,000/- रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कंपनीची, क्रेटा कार क्रमांक MP 09 WC 1485 असा एकुण 28,02,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी शासकिय पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला आहे. नमुद कारचालका विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गुरनं. 478/2023 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1885 चे कलम 18(ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक, संदीप पाटील तसेच सपोनि/सागर ढिकले, पोउपनि/सुहास आव्हाड, पोउपनि/योगेश माळी, चालक पोहेकॉ/नितीन वाल्हे, पोहेकॉ/राहुल भिमराव सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, पोना/महेंद्र पाटील, भुषण पाटील, तुकाराम चव्हाण, दिपक प्रभाकर पाटील, पोकॉ/ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, पवन पाटील, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर गिते, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव, संदीप पाटील सर्व. नेम
चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच फोटोग्राफर अनिकेत चंद्रशेखर जाधव, वजन मापाडी वजन मापाडी अक्तर युनुस छुटाणी रा. चाळीसगांव व पंच संजय धोंडु चव्हाण, विनोद कृष्णा मेन यांनी संयुक्त अभियान राबवुन केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI सुहास आव्हाड व पोहेकॉ/विनोद भोई, पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






