चाळीसगाव :- एका प्रौढाने बँकेतून काढलेली ३ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी दुचाकीला अडकवली असता भामट्याने वृद्धाचे लक्ष नसतांना ही पिशवीच लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
या भामट्याने केवळ १० सेकंदात ही पिशवी लंपास करून तेथून काही अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या साथीदारासह दुचाकीवरून धूम ठोकली. सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील वयोवृद्ध नामे राजेंद्र तान्हीराम वाणी ( वय – ५७) यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले होते. मात्र चोरट्यांनी ते पिशवीसह लंपास केल्याची धक्कादायक घटना आज शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तत्पूर्वी सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेला आहे.
यामुळे सदर भामटा कुठे आढळून आल्यास त्वरित शहर पोलीस स्थानकाला संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. यासाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. संदीप पाटील – पोलीस निरीक्षक (मो.९८५००८७४५६), सुहास आव्हाड- पोउपनि – (मो.८८५०१२६७१८), योगेश माळी- पोउपनि (मो.७९७२००५६३९) व योगेश बेलदार पोहवा (मो.७०२०३१६३३५) आदी संपर्क क्रमांकांचा समाविष्ट आहेत.
पहा CCTV व्हिडिओ
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






