एरंडोल :- पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर समाजकंटकांनी गोंधळ घालून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना,पांडववाडा
सार्वजनिक उत्सव समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या पदाधिका-यांनी निषेध केला.प्रसाद दंडवते यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी पांडववाडा
संघर्ष समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वच पदाधिका-यांनी घटनेची चौकशी करून यामागील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेवून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरात ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही समाजकंटकांनी पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर विविध घोषणा देवून घरावर बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी श्री.दंडवते यांना जीवे मारण्याच्या घोषणा युवकांनी दिल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.यावेळी प्रसाद दंडवते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी संयम राखून शहरात कोणतीही अनुचित घटना होणार नाही तसेच शहरातील शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेतली होती.
शनिवार दिनांक ७ |१० | २०२३ रोजी पांडववाडा संघर्ष समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली होती.यावेळी प्रसाद दंडवते यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.बैठकीत दंडवते यांच्या घरासमोर समाजकंटकांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला.प्रसाद दंडवते यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.या घटनेतील मुख्य सूत्रधार, समाजकंटकांचा पोलिसांनी शोध घेवून त्यांचेविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.मात्र काही ठराविक युवक
धार्मिक भावना भडकतील अशा घोषणा देवून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत होते.बैठकीस भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर
काळकर, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रवींद्र महाजन,रमेश परदेशी,दशरथ महाजन,किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश
महाजन, कॉंग्रेसचे प्रदेश प्रातिनिध विजय महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर.डी. पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,संजय
महाजन,डॉ.नरेंद्र पाटील,सुभाष मराठे,
भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव, युवा सेनेचे (ठाकरे गट) अतुल महाजन,शहरप्रमुख प्रमोद महाजन, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कुणाल महाजन, अँड .आकाश महाजन,.अँड अजिंक्य काळे,राजा भेलसेकर, भोला पवार,अनिल महाजन,अमोल भावसार, संजय साळी,कुणाल पाटील,भूषण सोनार,नितीन बोरसे,राजेश
शिंपी,विक्रांत साळी,वीरभान महाजन,शुभम मोराणकर ,प्रकाश शिरोडे, पप्पू वाणी यांचेसह विविध धार्मिक, सामाजिक,राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






