मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्याचा आईचा आनंद क्षणात दु:खात बदलला, वाहनाच्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू.

Spread the love

बारामती : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बारामतीमध्ये घडली आहे. मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला घरी घेऊन जात असताना वाहनाच्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बारामती येथील रिंगरोडवर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतत असताना अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

तर त्याच्यासोबत असलेली आई गंभीर जखमी झाली आहे. तेजस विजय कासवे (वय-21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राधिका कासवे असे अपघातात जखमी झालेल्या तेजसच्या आईचे नाव आहे. तेजस याच्यावर बारामतीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. तो रिंगरोडवरुन आपल्या आईसोबत दुचाकीवरुन घरी जात होता.

परंतु याचवेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या एका हायवाने जोरात धडक दिली. यामध्ये तेसज याचा खाली पडून जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार