Viral Video: पाटणा- बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांची असंवेदनशीलता दिसून आली आहे. जिल्ह्यातील हाजीपूर मुजफ्फरपूर रोडवर एक अपघात झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृत व्यक्तीचे पार्थिक हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्याला नदीमध्ये फेकून दिले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकारी राकेश कुमार यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.ट्रकची धडक बसल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला. व्यक्तीचा मृतदेह त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला नाही, तर त्याला पुलावरुन खाली पाण्यात फेकण्यात आले. ‘हिंदूस्तान टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिले असून व्हिडिओ सत्यता ‘सकाळ’ने पडताळून पाहिलेली नाही.पोलिस मृतदेह पाण्यात फेकत असताना काही लोकांनी याचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहनंतर पाण्यातून बाहेर काढला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
पोलिस अधिकारी राकेश कुमार यांनी सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, पोलिस स्टेशनमध्ये एका दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. काही अवयव रस्त्यावर पडले होते. ते नदीच्या प्रवाहात सोडण्यात आले.व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की पोलिस कर्मचारी मृतदेह पाण्यात फेकत आहेत. मृतदेहाची पूर्ण चाळणी झालेली होती आणि कपडे फाटलेले होते. पुलाच्या कठड्यावर मृतदेह ठेवला जातो. त्यानंतर काठीच्या साहाय्याने मृतदेह नदीमध्ये फेकण्यात येतो. विशेष म्हणजे यावेळी अनेक वाहनं रस्त्यावरुन ये-जा करत असतात.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






