दोन अल्पवयीन बहिणींवर त्यांच्या वर्गातील ४ मुलांनी केला अत्याचार; पीडित बहिणींनी केली आत्महत्या.

Spread the love

प्रतापगड:- (राजस्थान) येथून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रतापगड जिल्ह्यात शनिवारी दोन अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केली. या दोघींवर वर्गातील ४ मुलांनी बलात्कार केला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.यासाठी त्या चार मुलांना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलींना त्रास देत होते. तर दुसरीकडे प्रतापगडचे पोलिस अधीक्षक (एसपी) अमित बुडानिया म्हणाले आहेत की, ‘आम्ही या घटनेतील एका अल्पवयीनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पीडित मुली पिपळखुंट गावात भाड्याच्या घरात कुटुंबासोबत राहत होत्या. हे घर मुख्य आरोपीच्या भावाचे होते. या दोन्ही मुली ज्या शाळेत शिकल्या त्याच शाळेत घरमालकाचा भाऊही शिकला. मुलींच्या वडिलांना घर असुरक्षित वाटले त्यामुळे त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला घर सोडले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने बुधवारी मुलींना शाळेत भेटण्यास बोलवीले. त्या ठिकाणी मुलींशी गैरवर्तन केले. त्यांना मारहाण केली. त्यांचे फोन हिसकावून घेतले.
या तिघांविरुद्ध बुधवारीच मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.

मात्र शनिवारी सकाळी मुलींनी आत्महत्या केली. त्यानंतर मुलांविरुद्ध मुलींच्या वडिलांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिस अधिकारी म्हणाले, ‘आम्ही आरोपीची चौकशी करत आहोत. मात्र आजपर्यंत बलात्काराच्या आरोपाबाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती कळेल.

हे पण वाचा

टीम झुंजार