जुलूस प्रकरणातील माजी नगरसेवकासह सर्व संशयितांची निष्पक्षपणे चौकशी करा.

Spread the love

हिंदू संघटना आणि राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

एरंडोल :- शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक असलम पिंजारी काही युवकांनी पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांच्या निवासस्थानासमोर विविध प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणा-या घोषणा देवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून घरावार बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्वांची निष्पक्षपणे चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रसाद दंडवते यांचेसह विविध धार्मिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकएम.रामकुमार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक असलम यांची गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते यांना ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमधील युवकांनी त्यांच्या घरासमोर विविध प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा देवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.प्रसाद दंडवते यांना दिलेल्या धमकीप्रकरणी संतापात झालेल्या विविध धार्मिक संघटनांचे पदाधिकारी व राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांव्ही भेट घेवून झालेल्या घटनेची माहिती दिली.

जुलूसमधील प्रमुख संशयित माजी नगरसेवक असलम पिंजारी यांची चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिका-यांनी केली.जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की प्रसाद दंडवते हे पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख असून सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या पांडववाडा प्रकरणात ते हिंदू पक्षाचा तक्रारदार असून अल्पसंख्यांक समाज त्यांचेवर वैर धरूनआहेत.ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमधील युवकांनी प्रसाद दंडवते यांच्या घरासमोर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोर दहशत निर्माण होईल असे कृत्य केले आहे.

याबाबत पोलीसस्थानकात ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना अटक करून चौकशी केल्यास अनेक प्रकारच्या गंभीर प्रकारांची उकल होण्याची शक्यता आहे.पांडववाडा प्रकरणातील वृत्त पाकिस्तानमधील ‘डॉन’ आणि हिंदू धर्माच्या विरोधात लिखाण करणा-या ‘दी वायर’ यामध्ये प्रकाशित झाली आहे.सदर वर्तमानपत्रास कोण माहिती पुरवतो,का पुरवतो यामागील उद्देश काय याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.माजी नगरसेवक असलम पिंजारी हा अज्ञात ठिकाणी युवकांच्याबैठका घेवून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

निवेदनात असलम पिंजारी यांचेवर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.असलम पिंजारी यांची गुप्तचर खाते,आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,रवींद्र महाजन, दशरथ महाजन,किशोर निंबाळकर,राजेंद्रचौधरी,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, भाजपचे सचिव अमोल जाधव,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेसचेजिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील,ज्ञानेश्वर वाणी,राजा भेलसेकर,माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकूर,डॉ.नरेंद्र पाटील,शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कुणाल महाजन यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार