Viral Video: प्रेमी युगुलांचा भररस्त्यावर दुचाकीच्या टाकीवर बसवून खुल्लमखुल्ला रोमान्स; व्हिडिओ व्हायरल.

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचा भररस्त्यात रोमांन्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. आपण कुठे आहोत काय करतोय याचं जराही भान या दोघांना नाहीये. हायवेवर स्पीडमध्ये दुचाकीवर एका तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारून बसले आहेत.त्यांच्या या व्हिडीओवर प्रवाशांसह नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय                                    

यांच्यामुळेच अपघात होतात……
प्रमी जोडप्याने अशा पद्धतीने भररस्त्यात एकमेकांना मिठी मारल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण हायवेवर तरुण दुचाकी चालवत असताना चित्रपटातील सिन प्रमाणे तरुणीने त्याला मिठी मारलीये. अशा तरुणांमुळे वाहन चालवताना त्यावर त्यांचे पूर्ण लक्ष नसते, परिणामी अपघात होऊ शकतो.
उत्तर प्रदेशमधील हापूर येथे ही घटना घडली आहे. या हायवेवरून जाताना अनेक व्यक्तींनी जोडप्याचा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये कैद केला आणि उत्तप्रदेश पोलिसांना टॅग केला. पोलिसांनी यावर आता अॅक्शन घेताली असून जोडप्याचा शोध घेण्यात आलाय. तसेच अशा पद्धती भररस्त्यात रोमांन्स केल्याने पोलिसांनी जोडप्याला दंड ठोठावलाय. जोडप्याकडून ८,००० रुपये दंड स्वरुपात घेण्यात आलेत.

या आधी देखील सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मेट्रो ट्रेन, लोकल ट्रेन तसेच अन्य ठिकाणी प्रेमी युगुलांचे रोमान्स करतानाचे असे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. अशा प्रमे जोडप्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीये

पहा व्हिडिओ

हे पण वाचा


टीम झुंजार