ड्रीम ११ वर अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली, पोलीस उपनिरीक्षकाने जिंकलं दीड कोटींचं बक्षीस

Spread the love

पुणे :- देव जेव्हा पण देतो तेव्हा छप्पड फाड देतो, अशी मराठीत म्हणं आहे. याचाच प्रत्यय पिंपरी चिंचवड येथील एका घटनेतून आला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यादरम्यान ड्रीम ११ वर टीम बनवली.यात त्यांच्या टीमला दीड कोटींचं बक्षीस लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सोमनाथ झेंडे असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून ते पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ यांना क्रिकेटची खूप आवड आहे. त्यामुळे ते प्रत्येक सामने बघत असतात.

मंगळवारी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यादरम्यान सोमनाथ यांनी ड्रीम ११ वर टीम बनवली. यामध्ये त्यांना दीड कोटींचं पहिलं बक्षीस लागलं. सुरुवातीला सोमनाथ यांना यावर विश्वास बसला नाही. मात्र, काही वेळाने त्यांच्या खात्यात दोन-दोन लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे सोमनाथ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी या गोष्टीची माहिती कुटुंबियासह मित्रांना दिली. बघता-बघता ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.

अनेकांनी सोमनाथ यांना फोन करुन शुभेच्छा देत आहेत. एकीकडे अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच नेते ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी करत असताना दुसरीकडे पोलिसांना देखील या गेमचं वेड लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हे पण वाचा

टीम झुंजार