पुणे :- पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. हा तरुण महिलेच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा.दरम्यान पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर एका महिलेसह चार जणांवर विविध कलमांसह अॅट्रॉसिटी अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. कोरेगाव पार्क येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी दुपारी साडेचार ते पाच या दरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
फिर्यादी महिला या कौटुंबिक कारणामुळे पतीपासून विभक्त राहत आहे. महिलेची आरोपी संतोष आणि त्याचा मित्र राहुल यांच्यासोबत ओळख होऊन मैत्री झाली होती. आरोपी संतोष याने महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेसोबत अश्लील चाळे करुन शारीरिक संबंधाची मागणी केली. शारीरिक संबंध ठेवले नाही तर बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पीडित महिलेने याबाबत आरोपी संतोष याच्या पत्नीला घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, फिर्यादी रविवारी दुपारी कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी आरोपी संतोष याच्या पत्नीने हॉटेलमध्ये जाऊन फिर्यादी महिलेला जातिवाचक शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष वामनराव भरेकर आणि त्याची पत्नी, मित्र राहुल शिवाजी जाधव, एका अनोळखी व्यक्ती विरोधात आयपीसी 354, 323, 504, 506, 34, अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






