एरंडोल पंचायत समिती तर्फे “मेरी मिट्टी मेरा देश” अंतर्गत अमृत कलश शोभा यात्रेचे भव्य आयोजन.

Spread the love

एरंडोल:- पंचायत समिती एरंडोल येथे अमृत कलश रॅलीचे 13 ऑक्टोबर रोजी तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती आवारात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन दिपप्रज्वलन, व शीला फलकाचे अनावरण चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी आमदार चिमणराव पाटील यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

एरंडोल तालुक्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचे पुष्पगुच्छ देऊन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांनी व उपस्थित नागरिक व महिला भगिनी यांनी पंचप्राण शपथ घेतली. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधून आलेले अमृत कलश पंचायत समिती स्तरावर सर्व मान्यवरांच्या हस्ते एकत्र करून केंद्राचे स्वयंसेवक यांच्याकडे आमदार चिमणराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सपुर्थ करण्यात आला. एरंडोल तालुक्यातील अमृत कलश याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली

ही शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील तिरंगा चौकात सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपाचा माझी माती माझ्या देश या कार्यक्रमाची रूपरेषा ग्राम स्तरावर ते तालुकास्तरावर शासन निर्णयाची अंमलबजावणी राबविण्यात येत आहे.
अध्यक्षीय भाषणात आमदार चिमणराव पाटील म्हणाले की सर्व माणसांचा विकास हा श्वासत विकास असून तालुक्यातील अधिकारी पदाधिकारी गाव पातळी कर्मचारी यांनी शासनाच्या सर्व योजना गाव पातळीवर प्रभावीपणे राबवून गावाच्या पर्यायाने देशाच्या विकास करावा असे प्रतिपादन केले.

स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान दिले तसेच आपल्या तालुक्यातील हुतात्म्यांनी बलिदान दिले यांना शतशः नमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 या वर्षापर्यंत भारत हा विकसित देश होईल असे सांगितले आहे म्हणून आपण आतापासूनच भारताला विकसित देश बनवण्यासाठी गाव पातळीपासून प्रयत्न केले पाहिजे असे आमदार चिमणराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, एस आर पाटील

पहा संपूर्ण कार्यक्रमाच्या व्हिडिओ.

तालुका संघटक संभाजी पाटील, टोळी सरपंच बाळासाहेब पाटील, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, एन डी ढाके, कृषी अधिकारी भरत मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज चौधरी, जि प उपअभियंता योगेश थोरात, गटविकास आरोग्य अधिकारी शिवाजी गुरगुळे , आर के पटाईत, योगेश पाटील, प्राप्ती पारखे, अर्चना बेलदार तसेच एरंडोल तालुक्यातील सर्व सरपंच पदाधिकारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, आशा सेविका व नागरिक यावेळी उपस्थित होते.

हे पण वाचा


टीम झुंजार