यावल : तालुक्यातील कासवा शिव रस्त्याने एका बंद स्टोन क्रेशर जवळ अवैद्य वाळु वाहतुक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर महसूल आणि पोलिसांच्या पथकांना मिळून आले. दोघ डंपर हे तापी नदीतुन अवैद्य गौण खनिज वाहतुकी करता वापरण्यात येत असल्याचा संशय असुन याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासवा ता. यावल येथील शिव रस्त्यावर गट क्रमांक ८ मध्ये बंद स्टोन क्रेशर आहे. या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फैजपुरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, मंडळाधिकारी बबीता चौधरी,तलाठी एस.व्ही.सुर्यवंशी यांच्या पथकाला अवैद्य रित्या तापी नदीतून वाळू वाहतूक करण्याकरिता दोन डंपर दिसून आले. तर या दोन्ही डंपरचे क्रमांक एम. एच. १९ सी. वाय. ४६४८ असे होते व मुद्दाम एकाच क्रमांक या दोन्ही वाहनावर टाकून शासनाची फसवणुक करण्या करीता वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा या पथकाने दोघे डम्पर ताब्यात घेतले आहे व या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय सपकाळे राहणार कासवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास साहायक फौजदार रशीद तडवी करीत आहे.
१० ब्रास वाळु साठा केला जप्त.
याचं कारवाई दरम्यान कासवे येथील नदिपात्रा जवळ अंदाजे १० ब्रास रेती साठा देखील महसुल व पोलिसांच्या पथकाने मिळुन आला तेव्हा सदर बेवारस म्हणुन मिळून आलेला हा वाळु साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






