फरकांडे ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी शरद पाठक यांची निवड.

Spread the love

एरंडोल :- तालुक्यातील फरकांडे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ निर्मलाबाई सुभाष पाटील यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंच शरद पाठक यांची नवीन सरपंचाची निवड होईपर्यंत प्रभारी सरपंच म्हणून ग्रा. प. च्या ठरावानुसार एरंडोल गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी नियुक्ती केली आहे.

पूर्वीच्या सरपंच सौ निर्मलाबाई पाटील यांच्यावर 18 सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला होता.सौ. पाटील यांनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले असून निर्णय प्रलंबित आहे. नवीन सरपंच पदाची निवड होईपर्यंत उपसरपंच शरद पाठक यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार